Ad will apear here
Next
संसदीय अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरीश बापट
गिरीश बापटपुणे : संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी त्यांची नियुक्ती केली. या समितीमध्ये लोकसभेमधील ३० सदस्य आहेत.

अर्थमंत्री अंदाजपत्रक मांडत असतात, या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केलेल्या अंदाजाची चिकित्सा करणे, शासनाच्या खर्चात काटकसर सुचवून शासकीय धोरणात आणि प्रशासकीय व्यवस्थेत कार्यक्षमता कशी वाढेल या दृष्टीने मार्गदर्शनपर सूचना करणे या सारखी कामे या समितीला करावी लागतात. ही समिती शासकीय धोरणानुसार व योजनांनुसार व अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे निधीवाटप केला आहे की नाही, याबाबत पडताळणी करते. या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारण्याचे लोकसभेला बंधनकारक नसल्या, तरी समितीच्या सूचना व शिफारशी मार्गदर्शनपर असतात. समितीच्या स्थापनेपासून अनेकदा  या समितीने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.  

या समितीच्या सदस्यांमध्ये धर्मेंद्रकुमार कश्यप, मोहनभाई कुंडारिया, दयानिधि मारण, के. मुरलीधरन, एस. एस.पलानीमणीक्कम, कमलेश पासवान, के. सी. पटेल, राजवर्धन सिंग राठोड, विनायक राऊत, अशोककुमार रावत, मागुंटा श्रीनिवासुलू रेड्डी, राजीव प्रताप रुडी आदींचा समावेश आहे.   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZHBCC
Similar Posts
खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली : ‘खासदार श्रीरंग बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकात संसदीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे’, असा गौरव लेाकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केला. येथील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांच्या हस्ते खासदार बारणे लिखित ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन झाले
‘लाभार्थ्यांच्या मतांचा आढावा घ्यावा’ पुणे : ‘केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीनंतर झालेले परिणाम व लाभार्थ्यांची मते याचा आढावा घेण्यात यावा,’ अशी सूचना केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते
‘नवभारत निर्मितीच्या मार्गावर जाणारा अर्थसंकल्प’ नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी, पाच जुलै रोजी त्यांचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, गरिबांना सोयी-सुविधा, संशोधन, डिजिटल अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला आहे. ‘हा
पत्रकारांसाठी ‘म्हाडा’तर्फे घरकुल योजना पुणे : ‘पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून, ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकारांचा घराचा प्रश्नही महत्त्वाचा असून, ‘म्हाडा’च्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language